माझा अनुभवलेला पाऊस
माझा अनुभवलेला पाऊस
माझा पाऊस पहा आलाय दारी
हें वर्षा सरी थांब थांब तु तरी
तुझ्या संगतीनं मला भिजू दे बरी
तुझ्या येण्याला मी आतुर राही
अशा ऐनवेळी का रे धडकी देई
बेधुंद बरस तुला पाहते मीही
नाचू अंगणी मोरावानी थुईथुई
पण गफलत अशी येथे पायच नाही
कुबड्याविना नाचण्याचे माझे स्वप्नच राही
हें वर्षा सरी थांब थांब तु तरी
तुझ्या संगतीनं मला भिजू दे बरी
तुझं येणं असं मज आवडे भारी
अशा अवेळी मी एकटीच घरी
धीर कसा सोडू रे वेडं मन गहिवरी
संगे भिजाया बाहुंचा आधार हो तू तरी
हें वर्षा सरी थांब थांब तू तरी
तुझ्या संगतीनं मला भिजू दे बरी
माझा पाऊस पहा आलाय दारी
