भीती नसावी हरण्याची
भीती नसावी हरण्याची
खेळाडूंना आवड असावी, फक्त ती खेळण्याची
सतत जिंकणाऱ्यांना, भीती नसावी हरण्याची
कित्येक क्षण दिले तुम्ही, सवय झाली हसण्याची
कधी तरी सगळ्यांना वेळ येते, गुपचूप बसण्याची
आधी प्रत्यक्ष नंतर चर्चा, तरी सवय वाचलेले बोलायची
सतत जिंकणाऱ्यांना, भीती नसावी हरण्याची
काय गरज इथे, प्रयत्न असतील तर झुकण्याची
जिद्द कायम आहे, पुन्हा येऊन जगण्याची
ही वेळ नाही वाईट वाटून, आपण खचण्याची
सतत जिंकणाऱ्यांना, भीती नसावी हरण्याची
धमक होती मना, काहीतरी मोठं करण्याची
पडलो मध्येच कधी, गरज नाही लपण्याची
साथ साऱ्यांची सोबत आहे, गरज परत पात्या धार द्यायची
सतत जिंकणाऱ्यांना, भीती नसावी हरण्याची
हिच खरी संधी आहे, अजून मोठं काम करण्याची
आलेली नकारात्मकता, अलगद अशी पुसण्याची
तुम्ही इतिहास घडवला, अजूनही घडवाल गरज नाही सांगायची
सतत जिंकणाऱ्यांना, भीती नसावी हरण्याची
