जगण्यासाठी
जगण्यासाठी
भरपूर काही शिल्लक आहे, याची डोळ्या पाहण्यासाठी
अजून खूप काही राहिलंय, फक्त ते जगण्यासाठी
आम्ही ही होतो पिल्ले, मोठे झालो उडण्यासाठी
आता बाळाची तयारी दिसते, उंच उंच झेपण्यासाठी
पुन्हा त्याच जागी जाऊन, प्रयत्न चुका सुधारण्यासाठी
अजून खूप काही राहिलंय, फक्त ते जगण्यासाठी
येते आठवण बापाची, जेव्हा घाई होते पळण्यासाठी
जागा बदलावी लागते नात्याला, तेव्हा वेळ येते कळण्यासाठी
नात्यांची मोहर ठळक उमठते, श्रेष्ठ त्यांना ठरवण्यासाठी
अजून खूप काही राहिलंय, फक्त ते जगण्यासाठी
जबाबदारी शिकऊन जाते, मन शांत राहण्यासाठी
जसा पाण्याला उतार हवा, पुढे पुढे ते वाहण्यासाठी
शेवटाला सारं जाऊन, एकत्र असं साठण्यासाठी
अजून खूप काही राहिलंय, फक्त ते जगण्यासाठी
डबकं असो तळ असो की सागर, ती जागा फक्त विसाव्यासाठी
पुन्हा निर्मिती तिथेच होते, नव्या सुरवातीसाठी
साऱ्यांचा प्रवास सारखाच, फक्त निवड वेगळी मार्गासाठी
अजून खूप काही राहिलंय, फक्त ते जगण्यासाठी