चुकलाय
चुकलाय
यशाचा मार्ग जणू, असंख्य संकटानी सजलाय
जगण्याच्या घाईत थोडा, ताळमेळ चुकलाय
कामे कित्येक अधुरी, सारा कार्यकाळ हुकलाय
मुखा जवळ येणारा प्रत्येक घास, काय तो रुसलाय
स्वतःचे स्वतःच अश्रू, गुपचूप तो पुसलाय
जगण्याच्या घाईत थोडा, ताळमेळ चुकलाय
माझा तो आवाज, संकटापुढे असा मुकलाय
प्रयत्नांची साथ सोबत, मनापासून थकलाय
आठवून सारं काही, चेहरा माझा सुकलाय
जगण्याच्या घाईत थोडा, ताळमेळ चुकलाय
पडलो तरी उठणार, हा स्वभाव मलाच खुपलाय
जिंकणार शेवटी नक्की, जीव प्रयत्नांच्या नांगरात गुफलाय
स्वप्नांना अलगद ठेऊन डोळ्या, पूर्ण होण्या जपलाय
जगण्याच्या घाईत थोडा, ताळमेळ चुकलाय
अपमान जरी पावलो पावली, वाट पाहत टपलाय
भीतीचा वाटा जो होता नशिबी, तो कधीच संपलाय
चालणे माझा धर्म, अन कायम मी धर्म पळलाय
जगण्याच्या घाईत थोडा, ताळमेळ चुकलाय
