आठवू मी कशाला
आठवू मी कशाला
मागचे दुःख आता आठवू मी कशाला
दाटली आसवे तर दाखवू मी कशाला?
भोग होते म्हणावे भोगुनी आज सरले
मोकळे आज झाले चाळवू मी कशाला?
बहरली बाग बघता जीव आनंदला पण
तोडुनी त्या फुलांना नासवू मी कशाला?
मोगरा छान फुलला गंध सगळा पसरला
जीव वेड्या मनाचा नादवू मी कशाला
प्रीत माझी बहरली चांदण्याने नहाली
प्रीत फुल गोंजराया आळवू मी कशाला
भाव भक्ती असावी चांगल्या माणसांवर
का उगी वैर त्यांचे ताणवू मी कशाला
हर्ष शोभास झाला पाहुनी मंदिराला
देव भेटी विना मग परतवू मी कशाला?
