STORYMIRROR

Manjusha Aparajit

Inspirational

3  

Manjusha Aparajit

Inspirational

कृष्ण शोध

कृष्ण शोध

1 min
211

नि:स्तब्ध मी, नि:शब्द मी

शब्दातल्या "अर्थात" मी

दृश्यातला अदृश्य मी ,

पिंडातला ब्रह्मांड मी


रेणूहूनी अति सूक्ष्म मी,

मोठा तरी विश्वाहूनी

वृक्षात मी , बीजात मी ,

हृदयी तुझ्या वस्तीस मी


गात्रात मी , स्पर्शात मी

प्राणात मी , जीवात मी

श्वासात मी, उश्वास मी,

शोधी मला पवनातही 


स्वरात मी, लयीत मी,

गीतात मी, तानेत मी

सप्त स्वरांचा साज लेवुनी

शोधी मला मुरलीत ही


राधेत मी , मीरेत मी ,

गोप गोपीच्या स्नेहात मी

द्वेषात मी , प्रेमात मी ,

भक्त मनातील कृष्ण मी


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational