वेदना
वेदना
कळल्या का तुला ?
मी , माझ्या वेदना .
आहे का मनात,
तरल भावना?
पावसासारखा,
कोसळला कधी ?
गुलाबी थंडीत
भेटलास कधी?
मोगऱ्याची फुले,
दिलीस का मला ?
रातराणी सवे
भेटला का मला ?
रुक्ष ग्रीष्मापरी ,
आला आणि गेला .
वाळवंटा परी,
कोरडा राहिला.
क्षितिजा पल्याड,
थबकलेली मी.
मिलना साठीच
आसुसलेली मी .