STORYMIRROR

Manjusha Aparajit

Inspirational Others

3  

Manjusha Aparajit

Inspirational Others

वाढदिवस आबांचा

वाढदिवस आबांचा

1 min
162

गेली होती शब्द फुलांच्या बागेत, 

वेचायची होती छान छान फुले चार ,

हाती आली तीच वेचली , आबा ,

तुमच्यासाठी केला त्याचा हार.


माणुसकी जपणारे , माणसं जोडणारे, 

जोडलेल्याना टिकवणारे आबा आमचे थोर,

काव्य पुष्प बहरेल कसे ,

मनी त्यांच्या असे सदैव घोर .


चुकलो तरी सावरून धरणारे , 

कधी न रागवणारे आबा .

प्रेमाची सावली देणारे ,

आपलेच वाटणारे आमचे आबा .


वाढदिवशी तुमच्या आबा ,

स्वामी समर्था पुढे पसरून पदर,

मागणे एकच मागते आता ,

जगो आबा वर्षे शंभर आणि चार 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational