STORYMIRROR

Manjusha Aparajit

Inspirational Others

3  

Manjusha Aparajit

Inspirational Others

कलाकार

कलाकार

1 min
146

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची किल्ली भरून पाठवलेला , 

किल्ली संपेस्तोवर नाचणारा,

कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा .


तीन अंकी नाटकाचा नायक ही मीच ,

खलनायक ही मीच,  

नायक खलनायकाची लढाई लढणारा, 

कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाची सुरवात होते माझ्या रडण्याने, 

आणि हर्षभरीत प्रेक्षकांच्या आनंदाने. 

अंक संपता संपता आनंदाची जागा चिंतेने व्यापायला लावणारा,

कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाचा शेवट असेल सुखद, तर दुसरा अंक असतो मस्त ,

आशा आकांक्षा, इच्छा पूर्तीचा.

नसेल तसा तर तरुणपणीच वार्धक्याला बोलावणारा,

कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.


तिसरा अंक सगळ्यात मोठा , सुख दुःखाने भारलेला ,

केलेल्या सत्कृत्याचे गोड फळ देणारा, दुष्कृत्याचा जाब विचारणारा.

सुटणार्‍यांचे हात धरू पाहणारा, धरलेल्या हातानी सहजपणे लाथाडलेला,

येतानाही रडलेला , जातानाही रडणारा , हास्य विसरलेला,  

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची किल्ली भरून पाठवलेला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational