STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

वसंत मोहरला

वसंत मोहरला

1 min
251

चैत्र वनवा सरता सरता

आंबेमोहर गजबजला 

रानातल्या पाखरांचा 

शिवारी सोहळा सजला ॥१॥


मधमाशांची गुणगुण सारी

लागली कानी पडू 

किलबिलणारे पक्षी आता 

नजरेस लागले पडू ॥२॥


कैर्या,चिंचा ,जाभंळाचे 

घड रानी डूलू लागलेत 

दगड गोफणी समवेेेत

पोरांचे घोळके जमू लागलेत ॥३॥


वसंंताची किमया न्यारीच 

ऊन पावसाचा दारी खेळ

कधी ऊन्हाची लाही लाही 

कधी गारांचा दारी मेळ ॥४॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational