वसंत गान
वसंत गान
रूतू राजाच्या
मनात आले
सृष्टीला त्या
क्षणीच सजवले
तरू सारे
रोमांचित झाले
फांदी वरती
कसे मोहरले
कळ्या कळ्यांचे
कण कण फुलले
पवना संगे
गंध पसरले
रंग रंग हे
असे पसरले
जणू कोणी
गालीचे आंथरले
आम्रतरू वर
कोकीळ गाणे
कुहू कुहूचे
वाजती तराणे
अशा सुंदर
वातावरणी
जन गाती
मोदाची गाणी
