आरोग्यम् धनसंपदा
आरोग्यम् धनसंपदा
खरच असे कथन
आरोग्यम् धन संपदा
हवे निरोगीच शरीर
न भासे कधी विपदा
देवाने दिधले शरीर
करावे तयाचे जतन
स्वच्छ आहार सेवन
करा नेमाने योगासन
निद्रा ,आहार , व्यायाम
ठेवता सदा नियंत्रित
नियमितता जीवनात
जगा जीवन आनंदित
चणे आहेत भरपूर
पण दात नाही मुखात
असूनी धनश्री संपदा
स्थिती होतसे जीवनात
संतवाणी सांगती सदा
रहा मनाने समाधानी
जीवन होईल वैभवी
जगाल सदैव आनंदानी
