वसंत ऋतू आगमन
वसंत ऋतू आगमन
ऋतू येतात ऋतु जातात आणि जिवनाला बहर देतात
असेच होते जिवनात वसंत ऋतू आगमन
पानगळीच्या शिषीरानंतर येणारा विविध रंगी वसंत
जणु ऋतु आनंदाचा उत्साहाने उत्सव साजरे करुन
सर्वांना आनंद वाटण्याचा वसंत
कोकीळ गान,आंब्याचा मोहोर, मोगऱ्याच
सुगंध घेऊन येणारा वसंत
फुलुन येणारी आणि भरभरून वाहणारी
फुलझाडे म्हणजे वसंत
हसत, नाचत गाणे गात चोहीकडुन येणारा वसंत
मनाला फुलवणारा आसमंतही गुंजवणारा
फुल फुल नवं बहरवणारा ऋतुराज वसंत
निसर्गाने माणसाच्या मनामनांत
नयनांत नवचैतन्य भरणारा
सुंदर ऋतु म्हणजे वसंत !!
