निश्चय
निश्चय
जग मला हरवायला निघालयं,
ऐकून मी हादरलेच होते
कारण माझ्या जगात सारे
आप्त माझे भरले होते
लहानपणी पाठ केलेली
भगवत् गीता मला आठवली
"सीदन्ती मम गात्राणिʼʼ चा
अनुभव मला देऊन गेली
त्या क्षणी आठवला त्या
युग पुरुषाचा संदेश
कृतनिश्चय म्हणत म्हणत
भरला मी माझ्यात आवेश
ह्या क्षणी दोस्तहो
मी फार खुशीत आहे
ह्या जगाशी ,नव्हे ह्या आप्तांशी
लढण्यासाठी दंड मी थोपटले आहे
ह्या युद्धात जिंकले तर
राणी तुमची बनून येईन
दुर्दैवाने संपले तर
आठवणी माझ्या देऊन जाईन
