STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

शीर्षक :- अत्तराप्रमाणे जिंदगी

शीर्षक :- अत्तराप्रमाणे जिंदगी

1 min
218

अत्तरा प्रमाणे जिंदगी ही

सुवासिक होऊन जावी

चंदनाप्रमाणे झिजावी

अन आठवणीत राहावी


फुलाप्रमाणे अर्पून जावं

शुभ कार्यांत निस्वार्थीपणे

सुगंधाने दरवळतील

सदा परोपकारी मने


प्रफुल्लित करू सर्वांना

देऊन प्रेमाचा गंध

मन विचार जुळतील

जुळतील रेशीम बंध


काट्यातही हसायला

गुलाबाकडून शिकावं

स्वार्थ अभिमान सोडून

भल्यासाठी झुकावं


सुख दुःख येत जातात

बदलतात जीवनाचे रंग

प्रेम विश्वासाच्या अत्तराने

पसरतो नात्यात सुगंध


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational