देशभक्ती द सर्जिकल
देशभक्ती द सर्जिकल
मारून मारून माराल किती
सव्वाशे कोटींचा हा देश आहे
तावून सूलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजून शेष आहे
लपून छपून लढता तुम्ही
औलाद तर भित्र्याची आहे
दाखवली जी झलक तुम्ही ती
पिसाळलेल्या कुत्र्याची आहे
कधी हिरवा निळा आणि भगवा ही
तुमची धार्मिक ढाल आहे
वाहिले जाते सीमेवर जे रक्त
ते तर फ़क्त लाल आहे
आमच्या शौर्याच्या कथा ऐकून
तुम्ही आता थकला आहात
झाडून गोळ्या फोडून बॉम्ब
तुम्ही पुन्हा चुकला आहात
वापरा कितीही शस्त्र अस्त्र
किंवा वापरा गळ्यात ताईत
तुमचे नापाक इरादे आता
कधी पूर्ण होणार नाहीत
होतील असेच सर्जिकल पुन्हा
तुम्ही तुमच्या हददीतच् मराल
पण मरण्याआधी एकदा तरी
या तिरंग्याला सलाम कराल !