अत्तराप्रमाणे जिंदगी
अत्तराप्रमाणे जिंदगी
अत्तरा प्रमाणे जिंदगी ही
सुवासिक होऊन जावी
चंदनाप्रमाणे झिजावी
अन आठवणीत राहावी
फुलाप्रमाणे अर्पून जावं
शुभ कार्यांत निस्वार्थीपणे
सुगंधाने दरवळतील
सदा परोपकारी मने
प्रफुल्लित करू सर्वांना
देऊन प्रेमाचा गंध
मन विचार जुळतील
जुळतील रेशीम बंध
काट्यातही हसायला
गुलाबाकडून शिकावं
स्वार्थ अभिमान सोडून
भल्यासाठी झुकावं
सुख दुःख येत जातात
बदलतात जीवनाचे रंग
प्रेम विश्वासाच्या अत्तराने
पसरतो नात्यात सुगंध