STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

शीर्षक :- आयुष्याची कविता

शीर्षक :- आयुष्याची कविता

1 min
124

धर्म मानतो कुणी मानतो 

कुराण बायबल गीता 

चला गड्यानो तुम्हा शिकवतो

आयुष्याची कविता


संस्कृतीचा विसर पडला 

प्रगती वाचून समाज घडला 

विकास कोणाचा कुठे रखडला

जपता का अस्मिता

चला गड्यांनो तुम्हाला शिकवतो 

आयुष्याची कविता 


जात जातीला रोजच भिडते 

दंगल हिंसा रोजच घडते 

मर्दानी या छाव्यांना

कसे कोणी सावरता 

चला गड्यानो तुम्हा शिकवतो 

आयुष्याची कविता 


सामान्याची मने कळेना 

शेतकऱ्यांना न्याय मिळेना

सत्तेच्या मंदिरी तरीही 

फुल पडे न चुकता

चला गड्यानो तुम्हा शिकवतो 

आयुष्याची कविता 


अबला रस्त्यावरती आल्या 

शब्द असुनी मुक्या झाल्या 

पशु समान त्या नराधमाना 

का दरबारी जगविता 

चला गड्यांनो तुम्हाला शिकवतो 

आयुष्याची कविता 


स्वार्थाने माणुसकी मेली 

ईमानदारी ही विकली गेली

देशभक्ती च्या नावाखाली 

समाज का रे लुटता 

चला गड्यांनो तुम्हाला शिकवतो 

आयुष्याची कविता


धर्मपंडित कित्येक आले,

कायद्याने समान केले,

झोपेत होते जागे झाले,

ढोंगी का उठविता,

चला गड्यांनो तुम्हा शिकवतो

आयुष्याची कविता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational