STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

वृक्ष संवर्धन

वृक्ष संवर्धन

1 min
864

स्वार्थासाठी जगणारा

माणूस पुन्हा चुकला

सृष्टीचक्र बदलले

अन् निसर्गही कोपला


दुष्काळ झाला पाण्याचा

दुष्काळ हिरव्या रानाचा

माणुसकीचा दुष्काळ अन्

बळी मुक्या प्राण्यांचा


अरे पुरे आता वृक्षतोड

उजाडले सारे गावं

संधारण तू घे हाती

एक तरी झाड लाव


संवर्धन होईल मृदेचे

होईल सुजलाम सुफलाम भूमी

वृक्ष जगतील रान फुलतील

तुझी माणुसकी येईल कामी


संवर्धन करू माणुसकीचे

अन् जपणूक निसर्गाची

होईल दुष्काळमुक्त भारत

अन् जगतील भारतवाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational