शीर्षक : एवढं फक्त ऐकत जा
शीर्षक : एवढं फक्त ऐकत जा
थकला तरी चालत जा,
पडला तरी उठत जा,
काळोख जरी दाटला,
मनात दीप ठेवत जा .
दुःख आले हसत जा ,
अश्रू सारे पुसत जा ,
वाट चुकली जीवनात,
नवी वाट तू शोधत जा.
वादळ आले झेलत जा,
तुफानाशी भिडत जा,
ढग दाटले नभातरी,
सूर्याकडे पाहत जा.
स्वप्न तुटले जोडत जा,
नवे स्वप्न तू पाहत जा,
दार बंद जरी झाले,
खिडकी नवी उघडत जा.
हात कुणी सोडून गेले,
स्वतःला तू धरून राहा,
जग म्हणाले हार झाली,
मन म्हणू दे—जिंकत जा.
जखम झाली भरत जा,
वेदना तू सहत जा,
काल गेला दूर आता,
नवा दिवस जगत जा.
रात्र कितीही वाढली,
पहाट नक्की उगवली,
आशेचा दीप मनामध्ये,
तेवत सदा , ठेवत जा .
जेव्हा मन हे थकून जाई,
“आता नाही” म्हणत राही
तेव्हा कुणी जवळ येऊन,
हळूच एवढे सांगावे—
"घाबरू नको, मी आहे,
तू फक्त पुढे चालत जा,
जीवन अजुनी बाकी आहे,
हसत रहा जगत राहा.”
डॉ गणेश पुंडे
