कैफ तो माझ्या स्वरांचा
कैफ तो माझ्या स्वरांचा
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या ,
रात्र आहे संपलेली, स्वागता तुम्ही सिद्ध व्हा
शब्द माझा मी दिलेला ,ठेवूनी साक्षी शशिला
कालच्या त्या सार्या व्यथांना, तुम्ही पुन्हा प्रसवू नका
तळपेन मी फिरूनी पुन्हा , सूर्या सवे नभ अंतरी
बरसेन मी धरती वरी , चपलेस ही हरवेन मी
तुम्ही परी गाऊ नका , कालची ती भैरवी ,
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या
ठिणगी ही मी , स्फुलिंग मी ,ज्वाला कधीही होईन मी
जाळेन ह्या सार्या जगाला , विसरू कधी ना देईन मी ,
तुम्ही परी या साथ द्याया , जगण्यास या आतुरले मी
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या..
