जीवन हे कसे जगावे
जीवन हे कसे जगावे
पाखरांसंगे घेऊन उंच भरारी
स्वातंत्र्याने जगावे
फुलाप्रमाणे उमलून नव्याने
सुगंध जगास द्यावे
पाण्यासंगे जरपून जरपून
खळखळून तेे वाहावे
चांदण्याप्रमाणे आकाशात
चमकून ते दिसावे
वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे
शांततेने जगावे
साखरेच्या दाण्याप्रमाणे
गोड ते बोलावे
दगडाची ठेच खाऊन
प्रयत्नाने करावे
मुंगीसारखे होऊनी लहान
परिश्रमास अर्थ द्यावे
झाडांच्या सावलीप्रमाणे
ममतेने ते वागावे
डोंगराच्या उंचीप्रमाणे
यशाने स्वप्न साकार करावे
सुख दुःखाच्या वाटेवरती
हिमतीने साथ द्यावी
शेवटी जीवन हे आनंदाने जगावे
आनंदानेे जगावे
