रामनवमी
रामनवमी
राम नवमी
आनंद पर्वणी
जन्माच्याच क्षणी
सुखाची हमी ...
जन्म रामाचा
आनंदी आनंद
लागला हो छंद
राम नामाचा ...
या अयोध्येत
नाम जप करी
सारीच नगरी
नामास घेत ...
गाते पाळणा
ही कौसल्या राणी
करतात गाणी
मुदीत क्षणा ...
नगरी सारी
नटली सजली
पाना फुलातली
दिसते भारी...
