वसंतोत्सव
वसंतोत्सव
मकरसंक्रांतीच्या नंतर
येते माघ शुद्ध पंचमी
निसर्गाच्या उत्सवाची
असते ती वसंतपंचमी
कमी होऊन थंडीचा तडाखा
होते आल्हाददायक वातावरण
सोळा कलांनी निसर्ग फुलतो
बहरते जणू पृथ्वीवर नंदनवन
संगम असतो निसर्गाची सुंदरता
अन मानवाची रसिकता यांचा
समन्वय व भावमिलन म्हणजे
आनंदोत्सव वसंत ऋतूचा
करूनी अर्पण नवीन पिकांची
दाखवून नैवेद्य देवाला
सरस्वती व लक्ष्मी ची पूजा
मनोभावे करती वसंतपंचमीला
