अखेरचे वळण
अखेरचे वळण
आठवणी माझ्या सरणार नाही,
तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही
असा तू बावरू नकोस,
पाऊल मागे घेऊ नकोस,
वाटेवरचे ते वळण,
पार करायला विसरू नकोस.
वळणाच्या त्या पलीकडे,
ताटव्याने मोगरा फुलला असेल,
प्रत्येक फुलाच्या गंधा मागे ,
सावली माझी तुला दिसेल
गंध भरल्या सावलीनीशी,
तुला सोबत करत राहीन,
तुला विजयी झालेला,
दुरूनच मी पहात राहीन
