वृद्धावस्था
वृद्धावस्था
वृद्धावस्थेत
माय बाप असो
वृद्धाश्रमी नसो
दोघे व्यथेत
आधारस्तंभ
सारखे सगळी
मुलेच आगळी
हे दीपस्तंभ
अश्रू डोळ्यात
मनी तगमग
मान डगमग
बांधे मोळ्यात
कपाळी आठ्या
सुरकुतलेल्या
थरथरलेल्या
हातात काठ्या
लाथाडलेली
हजारो संकटे
दिवस न कटे
संथाळलेली
नजर लागे
वाटेवर सदा
दिसावे एकदा
भरली रागे
विसावे नित्य
शुन्यात नजर
होईल गजर
सारे हो रित्य
