माणूस गेल्यावर
माणूस गेल्यावर
इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मरण हे येतंच
माणूस गेल्याचं दुःख जवळच्यांना वेदना देतंच
गेलेल्या माणसाचे गुण मात्र मनी धरावे
अन त्याचे अवगुण आपल्यापासून दूर करावे
त्यांच्या गोड आठवणींना हृदयात एक कोपरा द्यावा
त्यांनी केलेल्या चुका असतील तर त्यातून धडा घ्यावा
माणूस गेल्यावर तो चांगला होता की वाईट हे नाहीं पहावं
निदान फक्त माणूस म्हणून त्याला श्रद्धांजली देत रहावं
तसं निर्जीव झालेल्या त्याच्या देहावर रडणं उपयोगाचं नसतं
देह त्याचं कायम स्वरूपी शांत झोपी गेलेलं असतं
माणूस हयात असताना आपण कधीकधी त्याचा राग राग करतो
जिवंतपणे वाईट ठरलेला माणूस मात्र इथे मेल्यावरच चांगला ठरतो
