STORYMIRROR

Pranil Gamre

Tragedy Others

4  

Pranil Gamre

Tragedy Others

किती समजावले मी स्वतःला

किती समजावले मी स्वतःला

1 min
324

किती समजावले मी स्वतःला 

सोडून गेली तू ह्या जगाला 


तुझा स्पर्श जाणवतो पुन्हा पुन्हा का मला 

अबोल आठवणीत स्मरतो ग मी तुला 


तुझ्या सोबती होते जग माझे 

जगा वेगळे होते नाते तुझे नी माझे 


तुला स्मरण करताच पापण्या ओलावतात 

तुझे स्वर मला तुझपाशी बोलावतात 


स्वप्न आपले अपुरे राहिले 

स्वप्नात माझ्या तुला पाहिले 


मिठुणि डोळे झोप येत नाही 

तुझा चेहेरा डोळ्या समोर येत राही 


आता नाही भेटशील या जगी कुणाला 

असे समजावले मी माझ्या मनाला 


तुझे भास होते आता ते देखील नाही 

जग माझे तुझ्याविना सुने ते सुनेच राही 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy