STORYMIRROR

Shashikala Gunjal

Children Stories

4  

Shashikala Gunjal

Children Stories

बालपण

बालपण

1 min
517

तुझी कधी तरी थट्टा 

खूप आम्ही करायचो

 खिशामध्ये भेटवस्तू 

चिंचा बोरं भरायचो


 दिवाळीत फटाक्यांना 

किती तू घाबरायची 

बोटे कानात घालून

 धूम दूर पळायची 


तुला शाळेत मारलं 

तर मी वेडा व्हायचो

 तुला रडवनाऱ्यशी 

मारामारी करायचो


मजेशीर भांडण ती

 रुसुबाई व्हायचीस

 आठवतं ताई तुला 

माझी पापी घ्यायचीस 


 निरागस होतं जग 

छोटे होते दोघेजण 

बालपण देगा देवा 

तेव्हा होतं मोठ मन


साहित्याला गुण द्या
लॉग इन