STORYMIRROR

Shashikala Gunjal

Tragedy

4  

Shashikala Gunjal

Tragedy

वेदनेचा घाव

वेदनेचा घाव

1 min
23.9K

खऱ्याचं तू करतो खोटं खोट्यालाच भाव 

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


तुझ्या नावाखाली रोज लुटतात दान

एका तुकड्यासाठी गरीब फिरतो वणवण

त्याच्या भुकेलेल्या पोटाला विचार तू नाव 

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


अत्याचारी बलात्कारी टाकी वासनेचा डाव

विचारा पीडित देहाला तू वेदनेचा घाव

पुरे झाले अन्याय आता न्यायासाठी धाव

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


मोठा केला कसा तू रं व्यापाऱ्याचा गाव

कुणबी राबतो जगासाठी त्याच्या कवडीला ना भाव

विचार त्या पोशिंद्याला कष्टाचा रं ठाव 

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


गोरगरिबाला रोज लुटतात साली 

जिथे तिथं लुटालूट नाही गरीबाचा वाली 

वाळल्या संगे ओलं जळतंय ओल्यालाच भाव

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


भाऊ भावाचा वैरी झाला मोठं झालं धन 

गर्भातच होतंय कोवळ्या कळीचाही खून 

दगडामधल्या देवा तू रं आता तरी धाव

सांग देवा कधी भरल वेदनेचा घाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy