STORYMIRROR

Shashikala Gunjal

Romance

3  

Shashikala Gunjal

Romance

सखी

सखी

1 min
12K

सखी सहेली थांब ना

 मनातील गुज सांग ना 

दोन मैत्रीच्या सहवासातील 

उकल मनाची भावना


तुझी माझी गं अशीच मैत्री

 न दुरावो ती स्वप्नागती

 हृदयाच्या वाटा तू खोल ना

 मनातील गुज तू बोल ना


मैत्री तुझी माझी अशी खोल गं 

नाही कळायचे कुणाला मोलं गं

अंतर्मनातील गुपित तू खोल ना 

मनातील गुजगोष्टी तू बोल ना


मनातील गं अफाट वादळ 

स्थिरावेल गं वळणावर 

भीती मनातील सोड ना 

सखी सहेली थांब ना 

मनातिल गुज सांग ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance