STORYMIRROR

Shashikala Gunjal

Others

3  

Shashikala Gunjal

Others

सौभाग्य अलंकार

सौभाग्य अलंकार

1 min
13.5K

 नेसून भरजरी शालू

 चोळी बदामी लेली

 कोरून काजळ कुंकू 

नाकी मोरनी लेली


वाकी सरी दंडावरी

 हसते मुखी भारी 

कुरळ्या केसावरी शोभे

 मोत्या पवळ्याची जाळी


कंबरेला कंबर पट्टा 

खवी कमरेला वेढा

 वेणी वरी नागफडा 

हातात शोभे हिरवा चुडा


नाकात शोभे नथ 

गळ्यात काळी पोत 

कंपाळी कुंकू रंगल 

जशी ज्वाळाची लाल ज्योत


 चांदीच्या जोडव्याचा पाय 

टाकावा झोकूणी 

नटली सोळा शृंगाराने नार 

कंत बघतो वाकुनी


Rate this content
Log in