STORYMIRROR

Shashikala Gunjal

Others

3  

Shashikala Gunjal

Others

आई

आई

1 min
11.8K

आई हेच दैवत माझे 

आई हीच काशी

अखंड राहो माया ऐसे

मागणे देवाशी 


रात्र दिन कष्ट करूनी 

हाताचा केला पाळणा

लहानाचे मोठे केले 

आपल्या बाळांना 

आपल्या बाळासाठी 

दुःख शोषिसी गं कशी 

आई हेच दैवत माझे 

आई हीच काशी


ऊन पाऊस झेलूनी

तू वाढवले आम्हाला 

जीवाच्याही पलीकडे 

जपले आम्हाला 

आपल्या पाडसाला 

घेशी गं हृदयापाशी 

आई हेच दैवत माझे 

आई हीच काशी 


करीन तुझी चिंता दूर 

करीन तुझा हात

संस्काराच्या धड्यांचा

घेईन गं ध्यास 

नाही तुझा शब्द मोडणार

ठेवीन मी मान 

आई हेच दैवत जगा मी सांगेन


साहित्याला गुण द्या
लॉग इन