STORYMIRROR

kusum chaudhary

Classics

3  

kusum chaudhary

Classics

वाटतो अभिमान

वाटतो अभिमान

1 min
125

वाटतो अभिमान मज

देश भारत असे महान

देशभक्तांनी देशासाठी

अर्पिला आपुला प्राण


सोडूनी घरदार लढले

घेऊनी तळहाती शीर

करून संसाराची होळी

गेले फासावर ते वीर


त्याग, सत्य, अहिंसेचाही

आहे देशाचा इतिहास

शोर्य क्रांतीने स्वातंत्र्याचा

तिरंगा फडकला नभात


विविधेतून एकतेचा देई

जगाला संदेश निराळा

असा भारत देश माझा

सुजलाम जगात वेगळा


राहो अबाधित स्वातंत्र्य

ठेवू मनात अभिमान

अमृत महोत्सव साजरा

करू गाऊ स्वातंत्र्य गान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics