तुजला मी वंदीतो..
तुजला मी वंदीतो..
तूच माझा आदर्श
तूच माझे दैवत,
तूच उध्दार कर्ता
तूच प्रकाश ज्योत.
देवून अनेक उपमा
तुजला मी संबोधितो,
तुजला मी वंदीतो,शिक्षका
तुजला मी वंदीतो...!
तुझ्या मुळे मला हे
जीवन ज्ञान कळाले,
तुझ्या मुळेच मला
माणूसपण मिळाले.
पावन तव चरणी
हा माथा मी टेकतो,
महती तुझी गातो
शिक्षका, तुजला वंदीतो.
