प्रिय पाऊस....
प्रिय पाऊस....
आज पुन्हा मेघ दाटून आले,
आभाळ काळोखात मिटून गेले,
पुन्हा एकदा शब्दांच्या मैफिलीत मी न्हावून गेले,
मनात दाटलेले विचार कोऱ्या कागदावर फिरत होतें,
हात चालत होतें, शाई संपत होती,
हृदयातून मनात, मनातून कागदावर, अशी शब्दांची सैरभैर सुरु होती.
बघता बघता कोर पान शाईने भरलेले दिसले,
मलाही कळत नव्हते मी किती लिहीत होतें,
मग मला समजले,पाऊस माझा आवडीचा,
त्याच आनंदात माझे मन मोरासारखे नाचत होतें,
शब्दांची घेत आज मी साथ
मी लिहीत होते खास
आज मी लिहीत होतें खास...
