STORYMIRROR

komal Dagade.

Action Inspirational Children

4  

komal Dagade.

Action Inspirational Children

सैनिक

सैनिक

1 min
303

कधी थंडीत कुडकुडत,

तर कधी तप्त उन्हात,

करतात देशाचे रक्षण,

ते देशाचे सैनिक,

जवान म्हणून ओळखतात.


यांच्यात नाही राजकीय, सामाजिक, धार्मिक भेद,

विसरून सारे भेद,

एक होऊन,

जातात युद्धाला सामोरे,


युद्ध पराक्रमाचे पेरून बालमनावर बीज,

देतात शिकवण भारत माझा देश महान,

अन्यायाविरुद्ध कोणी लढा देतो, तर कोणी डंका वाजवतो,

तर कोणी हक्कासाठी भांडतो,

आणि ह्या देशाला बलाढ्य,

समृद्ध, सुंदर बनवतो.


स्वतःच्या जीवाचा करून त्याग,

भारतवासियांचे रक्षण करतो,

तो फौजी देशासाठी लढतो,


एकच ध्येय त्याच्या मनी,

भारत भूमिसाठी देतो प्राणाची आहोती..


तो सावध असतो म्हणून,

आपण निवांत झोपतो,

आपल्या आयुष्यासाठी तो ठेवतो,

नेहमीच मृत्यूशी गाठ,

त्याच्या उपकाराची जाणीव कृतज्ञने ठेवूया,

एक पणती त्याच्या आयुष्यासाठी घरामध्ये लावूया.....!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action