पाऊस
पाऊस
हळुवार दाटला नभी मेघ,
चहुकडे पसरला गारवा,
हिरवाईने नटली भूमी,
चिंब ओला उधाणलेला,
याच्या स्पर्शाने धरणीला,
नवा साज चढला,
ओल्या मातीचा सुगंध दरवळला ,
घ्या रे या काळ्या मातीचा गंध,
ह्या गंधात विरून जा,
आला आला रे आज पाऊस,
आता मनसोक्त भिजून घ्या,
आता मनसोक्त भिजून घ्या....