STORYMIRROR

komal Dagade.

Fantasy Inspirational Others

3  

komal Dagade.

Fantasy Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
122

बाप हा बाप असतो,

त्याची सावलीच खूप मोठी हिंमत असते,

वरून कणखर दिसणारा आत मुलायम असतो,

स्वतःची भूक, तहान विसरून कुटुंबासाठी झटतो

नेहमी कुटूंबासाठी सकारात्मक ऊर्जा तेवत ठेवणारा बापच असतो

बापाची संपत्ती नाही तर,

त्याची सावलीच सर्वात मोठी ताकद असते,

त्याच्याएवढे प्रेम करणारे काळीज या जगात मात्र कोणाकडे असते...?

काळजावर दगड ठेवून कन्यादान तो करतो,

पण त्या दिवशी तो हिरमुसून रडतो

बाप असेल तर सर्व इच्छा,

आकांशा,स्वप्नं पूर्ण होतात

'नाहीतर त्यागाशिवाय या जगात कोण कोणाला विचारतो,

आज तुमच्या नावाची सावली डोक्यावर नाही,

पण खचलेल्या मनाला सावरलंय मी..!

तुमच्या आठवणीत ओल्या होतात कधी डोळ्याच्या कडा,

तुमच्या अस्तित्वाचं वजन हवं होत सावरायला,

खूप आहेत या जगात जपलेली नाती,

पण तुमच्या एवढं प्रेम करणार काळीज कोणाकडे नाही

माझ्या हक्काचा हरवला आहे आधारस्तंभ,

ज्यावर मी विश्वास ठेवत होते करून डोळे बंद...!

आयुष्यात तुम्ही सर्व काही शिकवलं,

तुमच्याशिवाय जगायचं कसं हेच मात्र नाही शिकवलं


#Miss you baba 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy