आयुष्याच्या वाटेवर...
आयुष्याच्या वाटेवर...
आयुष्य हे असच असतं,
जे घडेल ते सहन करायच असतं,
पण त्यातही स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं,
आयुष्य हे असच असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, पण किती लोकांचं ऐकून जगायचं ते आपल्याच हातात असतं,
आयुष्य हे असच असतं,
कधी दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे करायचं असतं,
स्वतःच्या सुखाबरोबर इतरांनाही सुखवायचं असतं.
आयुष्य हे असच असतं,
झालेले अपमान पचवत,
कर्तव्य आपले पार पाडायचे,
इच्छा असो वा नसो,
पण मार
्ग बदलायचा नसतो,
आयुष्य हे असच असतं,
अधांतरी मार्गांवरून चालताना,
सुखाच्या वाटा शोधत,
दुःखाचे डोंगर पार करायचे असतात.
आयुष्य हे असच असतं,
कधी कोणासाठी त्याग करत,
त्यातही आपलं सुख शोधायचं असतं.
आयुष्य हे असच असतं,
मृत्यूला कवटाळताना,
समाधानाने जायचं असतं.
अजूनही वेळ आहे,
जगून घे तू स्वतःसाठी ,
आयुष्य हे एकदाच आहे,
त्यात पैसा नको येऊन देऊ आडकाठी
या सुंदर जगण्याला,
तू डोळे भरून पाहून घे,
आयुष्य एकदा तू जगून घे,
आयुष्य एकदा तू जगून घे...!