आठवणीतील पाऊस....
आठवणीतील पाऊस....
1 min
184
पाऊसाच्या सरी कोसळत होत्या,
त्याच्या थेंबानी अंग शहारले होतें,
थंडगार वाऱ्याची झुळूक,
मन वेडावून टाकत होतें.
पुन्हा एकदा उजळून निघाल्या,
त्या जुन्या आठवणी,
कधी हव्याहव्याशा तर कधी नकोशा होणाऱ्या,.
त्या आठवणीत मन कधी हसत होतें,
तर कधी रडत,
कशाला बसायचे त्या आठवणीत डोलत,
मी म्हणाले,नाही जगायचे त्या भूतकाळात
कशाला हरवायचे त्याच्यामुळे वर्तमानातील सुख,
मी ठरवले आज नव्याने अनुभवायचा हा पाऊस,
त्याला नव्याने साठवायचा डोळ्यात .
