पाप
पाप
मला वाटतय जगात या,देव खरचं असता तर
वाईट नसतं मुळीच, जग हे फार असते सुंदर
जातीपाती राहील्या नसत्या, नदया रक्ताच्या वाहिल्या नसत्या
देव माणूनी आईबापाला,ओव्या गाईल्या असत्या
कशाला राहीला असता अन्याय, सगळीकडे असता न्याय
कोण कशाला ठेवला असता,कोर्टात उगीच पाय
स्वार्थ, लाचारी, भ्रष्टाचार, झाले असते हद्दपार,
बुवाबाजी, भोंदूबाबा नसते झाले हे अवतार
नसते केले कोणी नवस,मंदिर कोणी उभारलं नसतं,
भजन किर्तन दूरच गेले, भिकारी कोणी न राहील असतं
लबाडी, फसवणूक, विश्वासघात,नसता भाऊ भावाचा वैरी,
माणूस माणसाला खाल्ला नसता,नसती मुळी गुन्हेगारी
देव इथं नाही म्हणून, देवाच्या नावावर चालतात धंदे,
तरुणीना बाहूपाशात घेऊन, महाराज ही नाचतात नंगे
माना न माना आहेत या,जगात देव आई नी बाप,
कुण्या देवानं सांगितलं,माणसाला करायला पाप
माणूसकीणं वाग माणसा,उतू नको, मातू नको,
स्वर्थापोटी माणून देव,डोकं दगडावर ठेऊ नको
नको होऊ तू नीतीभ्रष्ट, नको होऊ तू हैवान,
कर्म तुझे हवे भले,आरे माणसा ठेव तू जाण
पाप तुझं झालं आती तर,कोणता देव करील माप,
देव पाहिल तुझ्याकडे एवढे नको करू तू पाप
