भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
त्या एका संध्याकाळी
भेट तुझी माझी झाली
अलवार हितगूज होता
प्रीत अपूली ही फुलली.
प्रारब्धात असेल कदाचीत
आपली प्रीत ही बहरेल
अविवेकी भोळ्या भाबड्या
जीवाच्या ह्रदयात सामावशील
धावणाऱ्या जगाच्या पाठी
कोणीच नाही कुणाचा वाली
परंतू तू माझ्या या जीवनात
आनंदाची बरसात मात्र केली
डोळे जरी हे बंद तूझे
ओठ काय ते बोलून गेले,
पाउल पडे पुढच्या दिशेने
ओढ मनाची मज सांगून गेले.
तुझ्या धगधगत्या ह्रदयाने
उमग होतो आहे मजला
शब्द न उच्चारता प्रीतिचा
कळवलीया व्यथा मनाला
ओज तुझ्या चेह-याचा
दिसे मजला हास्यात मनी
रुजलेल्या या प्रेमाला
अंतरात घेतोया सजवूनी..
मनाला झुलवू नकोस आता
कर दुर हा दुरावा ग्रासलेला
रुजलेल्या या भावमनाला
ग्रहण नको ग या प्रेमाला

