STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

2  

Meena Kilawat

Inspirational

पक्का निर्धार

पक्का निर्धार

1 min
14.6K


असावे नितळ वर्तमान क्षण

निर्मळ पाण्यासम झरावे झरे

वलयांकित भोवऱ्याची तुफाने

येतात सुखदूखाची वावटळ वारे.

नियोजनबद्ध तडजोड करून

घेवूया सबळांचा शू न्य आधार

स्वबळे उडती पाखरे आकाशात

करूनी या मनाचा पक्का निर्धार

नजरेत भविष्याचे वेध बाळगुनी

सागरा प्रमाणे संथ टीकुन रहावे

प्रयासरथ जीवननौका हाकारुनी

सरीते प्रमाने लयबद्धतेने वहावे.

प्रकृतिच्या या वर्तमान क्षणात

आधारस्तंभ ही कधी डळंमळतात

जणू भावनांच्या या वणव्यात

प्राक्तने ही अशी कोसळून जातात

भविष्यात वेळ न घालवता आपल्या 

जीवनात नियोजनबद्ध आखणी करावी

मुक्तपणे शुद्ध आचरणात जगूनीया हे

आयुष्य परीसासमं अमुल्य मानावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational