जीवनातले कोडे
जीवनातले कोडे
माझ्या जीवनातले कोडे असे
मजला अद्यापही सापडत नाही
तुझ नी माझ नातच वाऱ्यापरी
अजून ही मला उलगडत नाही.......
खऱ्या प्रेमाचे देवूनी ही दाखले
कोमल मनाची स्थिती असंघटीत
बंधन ही काळजात रूजूनी बसली
प्रीतीचे रंग अभिनयातच वाहिलीत..........
आवरून ही डोळ्यातील आसवे
पापण्या आड उधळली लपवीत
प्रीतीच्या बहरात फुलवण्यासाठी
नात्याची वीण ही विणली गोठवत.........
बंध नाजूक नितळ असतात अशी
त्यागाच्या धाग्यानी ती जोडावीत
कधी काय होईल प्रश्न या जीवनी
ही रटाळ क्षणे कशीच काढावीत.........
मिठीचा दोरखंड मजबूत आवळूनी
श्वासांच्या या अश्या कोंडमाऱ्यात
चंचल मनव्याचे भ्रम सावरूनी या
चचंलवलये रूजवली या आयुष्यात..........
सप्तरंगी अभिलाषी या स्वप्नात या पाहूनी
नात्याची दिसली रेखीव अदा न्यारी
जरी असले चौफेर वादळे तरी ही
बांधून चढावी आव्हानात्मक पायरी.......
