STORYMIRROR

Meena Kilawat

Tragedy

2  

Meena Kilawat

Tragedy

कुठवर सहन करायच

कुठवर सहन करायच

1 min
2.6K


 अशी कशी ही एक आईबाई

टाकून गेली उकिरड्यावर बाळा

कुठवर सहन करायच आता

निष्ठूरपणाचा कळस पाहिला.

फुटके त्या बालकाचे नशिब

येताच जगी बाजार झाला

सभ्य समाजाने त्यास उचलून

कसायाच्या हवाली केला.

लहानगा निरागस अबोध तो

रस्त्यावरुन अनवानी चालला

दारूसाठी पैशे घेवूनी निघाला

चक्कर येवून तो खाली पडला.

पायातून रक्त निघून माती लाल

सभ्य मानसाने लक्तर पाहिली

बालकाची दुर्दशा पाहूनी त्याने

दवाखाण्यात मलम पट्टी केली.

डॉक्टर म्हणाले भुकेला आहे 

पोट खपाटिला होते लागले 

डोळ्यातून अश्रृ वहात पाहून  

बालकाला त्याची दैना विचारली

टाकून गेली होती उकिरड्यावर

त्या बालकाची खरच पराकाष्ठा होती

प्रयत्न करून बालसुधार गृहात 

त्या निराश्रिताची रवानगी केली होती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy