Upscची आरती
Upscची आरती
जय देव जय देव जय upsc
6 वर्ष झाले करुनी BSC
clear काही होईना देऊन upsc!!
जाणकार म्हणतात अभ्यास करा मन लावून
नाही वेळ लागणार 1 वर्षाहून,
पण करतोय तयारी 6 वर्षांपासून
Clear काही होईना, उपाय सांगा मनापासून!!
इतिहास केले, भुगोल संपविले,
Ethics करायला जास्त डोकं नाही लागले,
पण तरी काय करू luck नाही लागले!!
Polity, society मन लावून वाचले,
Disaster management तर अंगावरच खेळवले,
पण तरी काय करु मी luck नाही लागले!!
Economics साठी hindu डोळ्यात तेल घालून वाचला
Concept clear असूनी पेपर clear नाही झाला!
Option, essay म्हणे करतात सोने आपले
पण पोहचत का नाही तिथपर्यंत कदाचित नशीब फुसके आपले!!
नातेवाईकांनी डिवचले, बाहेरचे खूप हसले,
मेहनत करून पण यश मिळेना BSC करून 6 वर्ष झाले!
काही असले तरी आता हिम्मत नाही हरणार,
हसणाऱ्यांना आता जास्त हसू नाही देणार,
गेले ते 6 वर्ष पण अनुभव वाढले,
भारतच नाही तर जगही कळले
हार आता नाही मानणार,
हसतील त्याचे दात दिसतील
एकदा Posting निघाली की
मेलेलेपण जिवंत होतील!!
जय देव जय देव जय upsc
6 वर्ष झाले करुनी BSC
