थांब हिला विचारून सांगतो
थांब हिला विचारून सांगतो
अरे चल पार्टीला छान गप्पा मारू
चकणा चिकनसोबत मस्त पिऊ दारू
जेव्हा असे मित्र विचारतो
अन् मी मात्र म्हणतो, "थांब हिला विचारून सांगतो"
सर तुम्ही घर घ्या, काढा तुम्ही कर्ज
घरच्यांना सुखी ठेवणे हाच तुमचा फर्ज
जेव्हा एजंट एखादी पॉलिसी सुचवतो
अन् मी मात्र म्हणतो, "थांब हिला विचारून सांगतो"
दारी येणारा फेरीवाला घ्या म्हणतो भाजी
कोबी घ्या, गवार घ्या, पालक घ्या ताजी
हाक ऐकून त्याची मी टोपली पाहतो
अन् मी मात्र म्हणतो, "थांब हिला विचारून सांगतो"
ऑफिसला जाताना घालू कुठला ड्रेस
काय करावा बरं अाजचा भेस
जेव्हा मी मनास माझ्या विचारतो
अन् मी मात्र म्हणतो, “थांब हिला विचारून सांगतो"
नवतरुण सोबती माझा या म्हणतो लग्नाला
इकडे म्हातारा मित्र माझा भेटतो रुग्णाला
माझी इच्छा मी नेहमीच मारतो
अन् मी मात्र म्हणतो, “थांब हिला विचारून सांगतो"
अहो सुखी संसाराला देताना आकार
स्वप्ने आणि ध्येये होतील साकार
यासाठी मनाला नेहमी विचारतो
अन् मी मात्र म्हणतो, "थांब हिला विचारून सांगतो"