भूक
भूक
भूक संपवावी कशी
पोटी वणवा पेटला
अठरा विश्वाचे दारिद्य्र
ओटी दामाजी अटला
प्रश्न अनंत पडती
जीव वाचवण्यासाठी
गरिबिशी बांधलेली
साठ्या जन्माच्या रे गाठी
नको वाटते रे मजला
हे गांजलेले जीवन
परी पोटच्या पिलांना
नको रे ही वणवण
रिकामे होते उदर
कसे भरू मी कितीदा
ह्या भुकीची पाठवण
कशी करू रे एकदा
मला वाटते रे देवा
तुझी मोठी चूक झाली
का देवा तु मानवाला
न क्षमणारी भूक दिली
