मधुचंद्र
मधुचंद्र
1 min
318
अंग शहारले
तू ही रे बोलली
शब्द वेड्या मला
कविता सुचली
सखे तुला मी
घेतले जवळी
पाठीवरी तुझ्या
रेखीली रांगोळी
शब्द शांत झाले
मुके ही बोलली
रात तिमिरात
चांदणी भेटली
ऐक्य तुझे माझे
जाहले त्या वेळी
तृप्त झाले दोघे
एकत्र मिसळी
घन दाटलेले
सरीता वाहिली
प्रेम जलधारा
सखे ही लाजली
संपू नये रात
इच्छा रे वाटली
मम चंद्रासवे
मधुही नटली
